"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

पाथर्डी  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक जव्हार तालुक्यातील  गाव आहे. खडखड गावात गावदेवी  मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २७२८ आहे. ग्रामपंचायत मधील गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , अंगणवाडी केंद्रे , प्राथमिक आरोग्य उपकेंद्र  १,सभामंडप- अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच  ग्रामपंचायत मधुन कुकडी  नदी जात आहे वर्षभर वाहत असणारी नदी अशी महत्वाची ठिकाणे असुन तसेच मंदिरे, त्या पैकी पाथर्डी येथे राम मंदीर  आहे सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा गावदेवी ची विविध ठिकाणे अशे धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. तसेच पाथर्डी या गावात जगप्रसिद्ध वारली पेंटिंग, कागद्याच्या लगद्यापासून अप्रतिम असे  वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे बनविले जातात.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ती हंगामी शेती असुन खरीप हंगामातील भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद ही प्रमुख पिके घेतली जातात. भात आणि आंबा, काजु या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,

पाथर्डी  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पाथर्डी  ग्रामपंचायतने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत  पाणीपुरवठा काही गावांना नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे ऑफिस हे पाथर्डी या  ठिकाणी आहेत. व  निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

पाथर्डी  गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

पाथर्डी  ग्रामपंचायत जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ८५८.७२ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये  वार्ड आहेत. एकूण ११५७ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३७९० आहे. त्यामध्येब १९४६  पुरुष   १८४४ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने चढ उतार प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे. तसेच येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १६°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी २३०० मीमी पर्जन्यवृष्टी होते.

 लोकजीवन

पाथर्डी  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद व हंगामी आंबा, काजु  पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. मखर,माउली,साथी असे आदिवासी सन तसेच हिंदु सन गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

न्याहाळे बु, ग्रामपंचायत च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

संस्कृती परंपरा

पाथर्डी ग्रामपंचायत मधील गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण,सप्ताह,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात वर्षा दिवाळी अगोदर माउली तसेच भात कापणी नंतर साथी हे सन महत्वाचे असुन या सणांना गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामपंचायत मध्ये :- राम मंदिर, गावदेवी मंदिर , कुकडी ,पाझर तलाव  इ..

जवळची गावे

पाथर्डी  गाव जव्हार तालुक्यातील पूर्वे कडे मोखाडा जव्हार या दोन तालुक्याचा मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. साकुर ,आखर धानोशी.कडाचीमेट जंगलपाडा, वाळवंडा ,ऐनाई.  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


750
1856
927
929

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo